ग्राहक पळवतो म्हणून रिक्षाचालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

60

सामना ऑनलाईन । बंगळुरू

बंगळुरुतील प्रसिद्ध असलेल्या यूबी सीटी मॉलजवळ एका पार्टटाईम रिक्षाचालकावर इतर 4 ते 5 रिक्षाचालकांनी कोयत्याने प्राणघातक हल्ल्या केला आहे. या हल्ल्यात राजेश 25 (नाव बदललेले आहे) गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला 9 टाके पडले आहेत. राजेश आपले ग्राहक पळवत असल्याच्या रागातून त्याच्यावर इतर रिक्षाचालकांनी हल्ला केला आहे.

राजेश हा दिवसा एका खासगी ठिकाणी काम करत असून रात्री रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतो. तो रात्री 9 वाजेपासून ते साधारण 12 ते 1 वाजेपर्यंत पार्टटाईम रिक्षा चालवतो. सोमवारी रात्री राजेश नेहमीप्रमाणे ग्राहकाची वाट बघत यूबी सीटी मॉलच्या बाहेर थांबला होता. त्यावेळी एका रिक्षावाल्याने राजेशच्या रिक्षासमोरच त्याची रिक्षा लावून राजेशचा रस्ता अडवला. याच रिक्षाचालकाने मागील आठवड्यातही राजेशला असेच अडवून त्याच्यासोबत ग्राहक पळवत असल्याचे सांगत वाद घातला होता. विक्रमने त्याला शांतपणे त्याची रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले असता त्या ठिकाणी 4-5 इतर रिक्षाचालक जमले. मात्र त्याचवेळी ग्राहक आल्याने राजेशने कशीबशी आपली रिक्षा काढून तेथून निघून गेला.

साधारण 12.30 वाजण्याच्या सुमारास राजेश ग्राहकाला सोडून परत आला. त्यावेळी तेथे असलेल्या 5 रिक्षाचालकांनी त्याला बोलावले आणि अचानक मारायला सुरूवात केली. एकाने राजेशवर पाठीमागून धारदार कोयत्याने हल्ला केला. राजेशने तेथून पळण्याचा प्रयत्न केला मात्र लगेच जमिनीवर कोसळला. त्यावेळी दुसऱ्याने त्याच्या पोटात चाकूने खुपसण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथीत एक चहावाला राजेशच्या मदतीला धावल्याने राजेश कसाबसा तेथून निसटला व मॉलमध्ये गेला. मॉलमधील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत हल्लेखोर रिक्षाचालक पसार झाले. पोलिसांनी जखमी राजेशला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी कब्बून पार्क पोलील ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या