दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारला! रिक्षाचालकाने तरुणाचे दात पाडले

प्रातिनिधिक फोटो

दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याचा राग आल्यामुळे रिक्षाचालकाने तरूणाला दगड मारून दात पाडले आहेत. याप्रकरणी तोहीब शेख (रा. लोहगाव) याच्याविरुध्द विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या मारहाणी प्रकरणी सुमित शेळकंदे (वय 21, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत दुचाकीवरून मित्राचे उसने घेतलेले पैसे देण्यासाठी जात होता. धानोरी लोहगाव रस्त्यावर रिक्षाचालक तोहीबने सुमीतच्या दुचाकीला  कट मारल्याने तो खाली पडला.

संतापलेल्या सुमितने  त्याचा जाब  विचारत तुला रिक्षा नीट चालवता येत नाही का? अशी विचारणा तोहीबला केली. त्यामुळे राग आल्यामुळे तोहीबने रस्त्यात पडलेला दगड सुमितला फेकून मारला. त्यामुळे सुमीतचे दोन दात पडले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या