अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमामुळे ओवैसी यांचा तिळपापड, मोदींवर निशाणा साधत म्हणाले…

4097

अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले. भूमिपूजन कार्यक्रमानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. या कार्यक्रमात मोदींच्या सहभागावर सवाल उपस्थित करत त्यांनी लोकशाहीचा पराभव झाल्याचे विधान केले.

‘मी सुरुवातीपासून पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये अशी भूमिका मांडत आलो आहे. कारण ते कोणत्या विशिष्ट समाजाचे पंतप्रधान नाहीत, आणि हिंदुस्थानचा लोकशाही हा एकच धर्म असून आज याचा पराभव झाला’, असे ओवैसी म्हणाले.

तसेच आज हिंदुत्वसाठी यशस्वी दिन असेल कारण या कार्यक्रमात मोदी सहभागी झाले. मात्र पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात सहभागी झाल्याने धर्मनिरपेक्ष तत्वांचे उल्लंघन झाले आहे. आज मोदी या कार्यक्रमात म्हणाले की, हा कार्यक्रम देशाचे प्रतीक आहे. मात्र ते देशाचे पंतप्रधान असून देशाचे प्रतीक मंदिर किंवा मशीद असू शकत नाही हे त्यांना कळायला हवे, असेही ओवैसी म्हणाले. यावेळी त्यांनी तिथे 450 वर्ष बाबरी मशीद होती आणि भाजप, संघाच्या लोकांनी ती पाडली, असा उल्लेखही केला. यामुळे मी भावुक झाल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या