रोहिंग्यांना हाकलून द्या! नव्या समस्यांवर रामदेव उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, रोहतक

आसाममध्ये देशात घुसखोरी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सुरू करणाऱ्या आलेल्या राष्ट्रीय नागरिक रजिस्टर म्हणजेच एनआरसीचं समर्थन करतानाच योगगुरू बाबा रामदेव यांनी रोहिंग्यांना हाकलून द्या अशी मागणी केली आहे.

अग्रलेख : आसामचे झाले कश्मीरचे कधी करणार?

देशामध्ये कश्मीरसारख्या १० अन्य ठिकाणी समस्या निर्माण होऊ नये घुसखोरांना ताबडतोब देशाबाहेर केलं पाहीजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. जेशात ४ कोटी घुसखोर असल्याचा दावााही त्यांनी केला आहे.


घुसखोर कोणत्याही देशाचा असो मग तो अमेरिकेचाही का असेना तो देशासाठी धोका आहे असं रामदेव यांचं म्हणणं आहे. हरियाणातील रोहतक इथे पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव म्हणाले की आपण एक कश्मीरची समस्या नीट हाताळू शकत नाहीये अशा परिस्थितीत घुसखोरांवर कारवाई न करणं म्हणजे अजून समस्यांना स्वत:हून आमंत्रण देण्यासारखं आहे.