
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड अनमोल बिष्णोई याला अमेरिकेतून हिंदुस्थानात आणले जाणार आहे. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा तो भाऊ आहे. अनमोलचे नाव एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीतही आहे. बाबा सिद्दिकी यांची गेल्या वर्षी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली होती.





























































