परळच्या बीआयटी चाळीतील बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

482

‘भारतरत्न’ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळच्या बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळच्या बीआयटी चाळीला भेट दिली. बाबासाहेबांच्या खोलीत जतन केलेल्या वस्तू व छायाचित्रांची मुख्यमंत्र्यांनी माहिती करून घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या