भाजप हा विषारी साप! बच्चू कडू यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप म्हणजे विषारी सापासारखी पार्टी आहे. भाजपसोबत न दोस्ती, न दुश्मनी ठेवलेली बरी. आम्ही तर दुश्मनी करून बसलो, ते कधीही नाग पाठवू शकतात, अशा शब्दांत प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी हल्ला केला.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरून संशय व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान बच्चू कडू यांनी लोक भाजपकडे नेहमी संशयाने पाहतात. भाजपने खांद्यावर हात टाकले तरी लोक म्हणतात, हा मेला, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.