प्रवाशांची वाट लागली, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

कल्याण रेल्वे स्थानकातील परिस्थितीत

सामना ऑनलाईन, ठाणे

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेने येणारी आणि जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रेल्वे स्थानकांवर नीट माहिती मिळत नसल्याने आणि मुसळधार पावसामुळे प्रवाशांची वाट लागली आहे. कर्जत-चौक स्थानकादरम्यान आणि कल्याण-विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने त्याचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला आहे.

कर्जत आणि चौक स्थानकादरम्यान रुळावर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेलऐवजी कल्याणमार्गे कर्जतच्या दिशेने वळवण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये प्रगती एक्सप्रेस,नांदेड-पनवेल एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे तर पुणे-भुसावळ पॅसेंजरही दौंड-मनमाडमार्गे वळवण्यात आली आहे.