बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल झालेले शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना चौदा दिवसांची न्यायलीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर 24 तासात पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यानंतर आज दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 17 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.