ऑलिम्पिकच्या सरावासाठी वेळ मिळाला, मुंबईचा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीचे उद्गार

438

सायना नेहवाल, पी व्ही सिंधू, पारूपल्ली कश्यप, किदाम्बी श्रीकांत, बी साई प्रणीत, समीर वर्मा, सौरभ वर्मा यांसारख्या खेळाडूंमुळे बॅडमिंटन या खेळामध्ये हिंदुस्थानला गेल्या काही कर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करता आलेली आहे. त्यामुळे आगामी महत्त्काच्या स्पर्धांमध्येही हिंदुस्थानला याच खेळाडूंकडून मोठी आशा बाळगता येणार आहे. युकावा खेळाडूंची पावलेही या खेळाकडे वळू लागली आहेत. मात्र कोरोना व लॉकडाऊनमुळे बॅडमिंटन या खेळाच्याही स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम खेळाडूंवर होत आहे का, याबाबत मुंबईचा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी याला विचारले असता तो म्हणाला, लॉकडाऊनमधील सुरूवातीच्या दिवसांमध्ये टेन्शन होते. पण त्यानंतर थोडा स्थिरावलो. टोकियो ऑलिम्पिकही पुढे ढकलण्यात आले आहे. यामुळे खेळाडूंना या प्रतिष्ठsच्या क्रीडा स्पर्धेसाठी सराक करायला आणखी वेळ मिळाला आहे, असे मतही त्याने यावेळी क्यक्त केले.

ऑनलाईन मार्गदर्शन
– कोरोनामुळे ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे बॅडमिंटनपटूंना स्वत:च्या घरी जावे लागले. या कालावधीत खेळाडूंना कोचेसकडून ऑनलाईन मार्गदर्शन लाभले. या लॉकडाऊनमध्ये रनिंग, योगाकर जोर दिला. तसेच घरी बनकलेले जेकणच खात असल्यामुळे डाएटचा प्रश्नच निर्माण झाला नाही, असे चिराग शेट्टी याकेळी म्हणाला.

संयम ठेवला
– कोणत्याही खेळाप्रमाणे बॅडमिंटनमध्येही रिदम महत्त्वाचा असतो. पण लॉकडाऊनमध्ये सरावच करायला मिळत नव्हता. सुरूवातीला थोडी अडचण निर्माण झाली. मात्र यामुळे निराश झालो नाही. संयम ठेकला. शिवाय इंडियन ऑईल या कंपनीत नोकरीला असल्यामुळे वेतनही वेळेत होत होते. त्यामुळे त्याचेही टेन्शन नक्हव्हते, असे चिराग शेट्टी आवर्जून नमूद करतो.

स्पर्धा केव्हा सुरू होतील, हे आताच सांगता येणार नाही
– युरोपमध्ये फुटबॉल स्पर्धेला सुरूवात झाली. अमेरिकेत बास्केटबॉल स्पर्धा होताहेत. पण हिंदुस्थानात कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. तसेच बॅडमिंटन हा खेळ बऱयाच देशांमध्ये खेळला जातो. कोरोनावर लस आल्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होतील वाटत नाही. बॅडमिंटन स्पर्धेसाठी विविध देशांमधून स्पर्धक येत असतात. त्यामुळे आताच काही सांगणे कठीण असेल, असे चिराग शेट्टीला वाटते.

 कोरोना इफेक्ट जाणवणार नाही
– बॉडी कॉण्टॅक्ट खेळांमध्ये कोरोनाचा इफेक्ट जाणवू शकतो. पण बॅडमिंटन या खेळामध्ये तसा खेळाडूंचा एकमेकांशी फारसा संबंध येत नाही. लढत झाल्यानंतर शेक हॅण्ड करता येणार नाही. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी सर्व काही सॅनीटाइझ केले जाईल. यांसारख्या गोष्टी सोडल्या तर मोठा बदल होईल असे काटत नाही, असे चिराग शेट्टीला वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या