मानदेऊळगांव येथे ११ लाखाचा मौल्यवान दगड जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बदनापूर

जालना जिल्ह्यातील व बदनापुर तालुक्यातील मानदेऊळगांव येथे बेकायदेशीरित्या मौल्यवान दगडाचे उत्खनन करणाऱ्या ३ जणांना पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने पकडले. यावेळी पोलिसांनी काकासाहेब रतन खिल्लारे (रा. पिरपिंपळगाव,ता.जालना), बाबासाहेब रतन खिल्लारे (रा. पिरपिंपळगाव), जेसीबी चालक दिपक कडुबा लोखंडे (रा. सिंधीपिंपळगाव) यांना अटक केली आहे. यावेळी ११ लाखांचा मौल्यवान दगड जप्त करण्यात आला.

गायकवाड यांना याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी हे जेसीबीच्या सहाय्याने जमिनीत मोठा खड्डा करून माती उकरून त्यातून गौन खनिज गारगोटी बाहेर काढत होते. यावेळी पोलिसांनी ११ लाख ९४ हजाराचा मौल्यवान दगड व जेसीबी जप्त केला. याबाबत दनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कामगिरी पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधिक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक राहूल गायकवाड यांच्या पथकातील कर्मचारी पो हे कॉ वसंत राठोड, भागवत गवळी,महेंद्र मारसावळे यांनी केली असून पो हे कॉ रमेश वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.