
ऐन दिवाळीत गुजरातच्या बडोदा शहरातील वाघोडिया क्रॉसिंगनजीक पहाटे दोन ट्रकची एकमेकांशी जोरदार टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकमधून प्रवास करणाऱया 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 17 जण जखमी झाले. अपघातामधील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
या दुर्घटनेबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ‘बडोदा जवळ रस्ते अपघातामुळे मृत्यू झाल्याचे ऐकून दुŠख होत आहे. प्रशासकीय अधिकाऱयांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जे प्रवासी जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत. तसेच मृत्यू झालेल्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करीत अपघातग्रस्तांबद्दल दु:ख व्यक्त करीत जखमी लवकर बरे होवोत अशी भावना व्यक्त केली आहे.






















































