बद्रिनाथला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर दरड कोसळली, पाच जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बद्रिनाथला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर दरड कोसळली असून या दुर्घटनेत पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील बद्नािनाथ महामार्गावरील तीन धारा भागात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले भाविक हे पंजाबमधील मोहाली शहरातले होते. तसेच मृत्युमुखी पडलेले भाविक हे एकाच कुटुंबातील आहेत.