
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील बाजार समितीमधील कर्मचार्यांना शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी करत महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा यांनी एकत्रितपणे गुरुवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. गेल्या 40 वर्षांपासून राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिपाई ते सचिव पदापर्यंतच्या सर्व कर्मचार्यांवर अन्याय होत असल्याचा निषेध व्यक्त करत संघाने गुरुवारी सर्व बाजार समित्या बंद ठेवल्या. यावेळी मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, कर्मचारी संघटना अध्यक्ष दिलीप डबरे आदी उपस्थित होते.




























































