
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावरील स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि सामान्य जनता शिवतीर्थावर येणार असल्यामुळे मुंबई महापालिका, पोलीस व शिवसैनिकांची व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींना स्मृतिस्थळाचे विनाअडथळा दर्शन घेता यावे म्हणून मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
वाहने पार्किंगसाठी व्यवस्था
- पश्चिम व उत्तर उपनगरातून मोठय़ा वाहनांतून येणाऱ्या (उदा. बसेस, टेम्पो आदी) कार्यकर्त्यांनी माहीम जंक्शन येथे डावे वळण घेऊन मोरी रोड मार्गे सेनापती बापट मार्गावरून बाळ गोविंददास मार्ग जंक्शनपर्यंत येऊन वाहने पार्क करून स्मृतीस अभिवादन करण्यासाठी जावे. जीप अथवा कार एल.जे. रोडने राजा बढे चौकापर्यंत न्यावीत व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर सदर वाहने सेनापती बापट रोडवर पार्किंगसाठी पाठवावीत.
- पूर्व द्रुतगती महामार्गावरून येणारी मोठी वाहने (उदा. टेम्पो व बस) सायन जंक्शन येथून उजवे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने ‘वाय’ जंक्शन ‘टी’ जंक्शन मार्गे धारावी, कलानगर, माहीम काॅजवे, माहीम जंक्शन डावे वळण मोरी रोड मार्गे सेनापती बापट मार्गावर जातील. वाहनातील कार्यकर्ते उतरल्यानंतर वाहने सेनापती बापट मार्गावर पार्क करावीत. आवश्यकतेनुसार पोलीस अधिकारी व अंमलदार सदर वाहने डॉ. बी. ए. रोडने दादर टीटीपर्यंत जाऊ देतील व तेथे वाहनांतील कार्यकर्ते उतरल्यानंतर सदरची वाहने रुईया जंक्शनमार्गे पाच उद्यान पार्क परिसरात पार्क करतील. जीप व कार ही वाहने डॉ. बी.ए. रोडने रुईया जंक्शनपर्यंत नेऊन त्यातील कार्यकर्ते उतरल्यानंतर रुईया जंक्शन येथून उजवे वळण घेऊन लखमशी नप्पू रोड (हिंदू काॅलनी) येथे पार्किंगसाठी जातील.
- दक्षिण मुंबईहून येणारी वाहने (उदा. टेम्पो व बस) हे डॉ. अॅनी बेझंट मार्गे काशीनाथ घाणेकर जंक्शनपर्यंत येतील व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर ती सयानी रोडने सेनापती बापट मार्गावर पार्किंग करतील.
- दक्षिण मुंबईहून डॉ.बी.ए. रोड मार्गाने येणारी वाहने दादर टीटीपर्यंत येतील व तेथे त्या वाहनातून कार्यकर्ते उतरल्यानंतर ती पाच उद्यान पार्क माटुंगा येथे
पार्किंग करतील.
वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते
- एस.व्ही.एस.रोड, (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन)
- केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळस्पूर (उत्तर) दादर
एम. बी. राऊत मार्ग, (एस.व्ही.एस. रोड ते एल.जे. रोड) दादर - पांडुरंग नाईक मार्ग, (रोड नं. 5 जंक्शन ते एल.जे. रोड) दादर
- दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक) दादर
- दिलीप गुप्ते मार्ग, (छत्रपती शिवाजी महाराज पार्प गेट क्र. 4 ते शीतलादेवी रोड) दादर
- एन. सी. केळकर मार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक) दादर
वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग
- स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन)
- राजा बढे चौक जंक्शन ते केळुस्कर मार्ग उत्तर जंक्शनपर्यंत
- दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी
- गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर
- दादासाहेब रेगे मार्ग
- सेनापती बापट पुतळा येथून गडकरी जंक्शनपर्यंत
- बाळ गोविंददास मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन
- सेनापती बापटपासून पश्चिम दिशेला लेडी जमशेटजी मार्गापर्यंत
दर्शन व्यवस्था
- शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, जि. प. अध्यक्ष व मान्यवर व्यक्तींसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील संयुक्त महाराष्ट्र दालनासमोरील शिवपुतळ्याशेजारील प्रवेशद्वारातून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
- शिवसैनिकांसाठी व इतर सर्वांसाठी समर्थ व्यायाम मंदिराकडून दर्शन रांगेतून प्रवेश दिला जाईल.
- दर्शन रांगेतून येऊन स्मृती चौथऱ्यावर पुष्पांजली वाहण्याची व्यवस्था केली आहे. त्याप्रमाणे सहकार्य करावे.
- छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील रस्त्यांवर वाहने उभी करण्यास परवानगी नाही याची कृपया नोंद घ्यावी.
- महानगरपालिकेच्या वतीने 5 ठिकाणी पाणपोईची व्यवस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात शौचालये उभी करण्यात आली असून कबड्डी असोसिएशनच्या शेजारी तात्पुरत्या प्राथमिक आरोग्य केंद्राची आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे.
वाहने उभी करण्यास परवानगी असलेले रस्ते
- संपूर्ण सेनापती बापट मार्ग, माहीम ते दादर
- पाच उद्यान (फाईव्ह गार्डन्स) परिसर माटुंगा
- लखमशी नप्पू रोड (हिंदू काॅलनी) माटुंगा































































