
मुंबई विद्यापीठाच्या दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अध्यासन पेंद्राच्या वतीने तसेच सार्थ प्रतिष्ठान आणि मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्योत्तर मुंबई ः जडणघडण व विकास’ विषयावर आधारित ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेतून सर्वसामान्य मुंबईकरांच्या नजरेतील मुंबईची विविध रूपे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
छायाचित्र स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकते. एका स्पर्धकाची एकच प्रवेशिका स्वीकारली जाणार असून स्पर्धकाने एका प्रवेशिकेमध्ये विषयाशी निगडित पॅमेरा किंवा मोबाईल पह्नने काढलेली चार छायाचित्रे [email protected] या ई-मेलवर 12 मेपर्यंत पाठवायची आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक बहाल केले जाणार असून प्रथम क्रमांक पारितोषिक रुपये 10 हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र, द्वितीय क्रमांक पारितोषिक रुपये 8 हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र, तृतीय क्रमांक पारितोषिक रुपये 6 हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये 5 हजार सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या छायाचित्रांचे तसेच निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन 17 ते 19 मेदरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित केले जाणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन अध्यासन पेंद्राचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी केले आहे. संपर्क – स्पर्धा प्रमुख नीलेश सावे 9511723827.
स्पर्धेचे नियम
z स्पर्धकाने ई-मेलमध्ये नाव, पत्ता, मोबाईल पह्न क्रमांक, व्हॉट्सअॅप क्रमांक अशी संपूर्ण माहिती सादर करावी.
z प्रत्येक छायाचित्र हे जेपीईजी स्वरूपात असावे व फाईल साईज 5 एम.बी.पेक्षा जास्त नसावा.
z 4 छायाचित्रांसाठी 25 एम.बी.पेक्षा कमी फाईल साईज असेल याची काळजी घेण्यात यावी.
z स्पर्धेसाठी सादर केलेली छायाचित्रे ही स्पर्धकाची स्वतःची निर्मिती असावी.
z छायाचित्रे पिकासा, पह्टोशॉप किंवा तत्सम छायाचित्र एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने बदल केलेली नसावीत.
z स्पर्धेसाठी सादर केलेली छायाचित्रे ही यापूर्वी कुठल्याही माध्यमांमध्ये प्रकाशित झालेली नसावीत.
z सदर छायाचित्रांमध्ये कोणतीही आक्षेपार्ह व अनुचित बाब नसावी याची संपूर्ण दक्षता स्पर्धकांनी घ्यावयाची आहे.


























































