
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी आणि संभाजीनगर या पाच शहरांमध्ये बुधवार, 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी घसघशीत पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्राथमिक फेरीत प्रथम येणार्याला 25 हजार आणि सन्मानचिन्ह, द्वितीय 15 हजार आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय 10 हजार आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र तर सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.
मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ अशा पाच विभागांकरिता अनुक्रमे संभाजीनगर, मुंबई व रत्नागिरी, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात या स्पर्धेची प्राथमिक फेरी बुधवार, 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2018 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. यातून निवडून येणार्या 25 स्पर्धकांची अंतिम फेरी मुंबईत 14 ते 16 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. संपर्कासाठी 1800228595/022-24211818/022-24228888.
स्पर्धेचे विषय
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
- शिवसेना…गरज महाराष्ट्राची…राष्ट्राची!
- जय जवान…जय किसान
- कुठे आहेत अच्छे दिन?
- नोटाबंदीत साधले काय?
- शेतकरी आत्महत्या…कारणे व उपाय
- ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न व उपाय
- देशाची अर्थव्यवस्था…बिकट की, बळकट?
- असा घडवू या महाराष्ट्र!
- हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व!
- युवाशक्ती…राष्ट्रशक्ती!
- युवकांनो राजकारणात या! लोकशाहीचे वस्त्रहरण होते आहे काय?
- बुलेट ट्रेन कशासाठी…कुणासाठी?
- कोकण जपू या!
- पाणी पेटते आहे!
- जगणे महाग होत आहे!
- महाराष्ट्राचे लोकनायक…आदरणीय उद्धवजी ठाकरे































































