सोमवारपासून कलर्सवर बाळूमामाच्या नावानं चांगभलं

358

लोकपरोपकारार्थ आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेल्या ‘श्री सदगुरू संत बाळूमामा’ यांचे चरित्र आणि त्यांच्यातील दैवत्वाची प्रचिती लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कलर्स मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे साक्षात महादेवाचे स्वरूप मानल्या जाणार्‍या ‘संत बाळूमामा’ यांचे जीवन चरित्र. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका येत्या १३ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. संतोष अयाचित लिखित या मालिकेची निर्मिती साजरी क्रिएटीव्हज यांनी केली आहे. अकोळ या गावामधील धनगर समाजातील एका कुटुंबामध्ये बाळूमामांचा जन्म झाला. बाळूमामांच्या जन्माआधीपासूनच त्यांच्या आईला हे सत्य उमगले होते की त्यांच्या उदरामध्ये वाढणारे बाळ हे असाधारण आहे. याच गावामध्ये देकऋषी यांचा मोठा धाक होता. तर दुसर्‍या बाजूला बाळूमामा होते.  त्यांच्या शक्तीची प्रचीती हळूहळू लोकांना येत गेली. या सगळ्या प्रवासामध्ये बाळूमामांची आई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. आई सुंदराने बाळूमामांना कसे घडवले?  देवऋषी आणि बाळूमामा यांमधील संघर्ष कसा होता हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या