
मुस्लिमांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या दारुल उलूमच्या वेबसाइटवर जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. दत्तक घेतलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेत कायदेशीर अधिकार देऊ नये, असा फतवा दारुल उलूमने जारी केला होता. हा फतवा त्यांच्या वेबसाइटवर असल्यामुळे जिल्हा न्यायदंडाधिकारी अखिलेश सिंह यांनी ही कारवाई केली. याबाबत योग्य ती कारवाई करून सखोल चौकशी करावी, अशी सूचना राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने केली होती. त्यावरून सहारनपूर जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. उत्तर प्रदेशच्या देवबंदमध्ये मुख्यालय असलेली मुस्लिम धर्मगुरूंची ही संस्था धार्मिक शिक्षण देण्याचे काम करते.

























































