डीजेवर बंदी कायम, डॉल्बीला परवानगी देण्यास हायकोर्टाचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव संपला असून आता तरी डीजे वाजविण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या डीजे-डॉल्बी व्यावसायिकांना हायकोर्टाने आज दिलासा देण्यास नकार दिला. ध्वनिप्रदूषणामुळे डीजेला परवानगी नकोच असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास नकार दिला व व्यावसायिकांची मागणी फेटाळून लावली.

मर्यादित आवाजात डीजे वाजवला तरीही डीजे व्यावसायिकांवर कारवाई केली जाते. अनेक ठिकाणी पोलिसांनी डॉल्बी-डीजे साऊंड सिस्टमची गोदामे सील केली आहेत. पोलिसांच्या कारवाईविरोधात प्रोफेशनल ऑडिओ व लायटिंग असोसिएशन या संघटनेने हायकोर्टात ऍड. सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. नवरात्रोत्सव संपला असून ही बंदी उठवण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.