कॅनडामध्ये खलिस्तानी झेंडे फडकवण्यावर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडामध्ये खलिस्तानी झेंडे फडकवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधीच्या विधेयकाला संसदेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे धार्मिक स्थळांबाहेर लोकांना धमकावणे किंवा अडथळा निर्माण करणे हादेखील गुन्हा मानला जाईल. कॅनडा संसदेच्या कनिष्ठ सभागृहात ‘कॉम्बॅटिंग हेट ऍक्ट’ नावाच्या या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. आता हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी कॅनडाच्या सिनेटमध्ये पाठवण्यात आले आहे. तर कंझर्व्हेटिव्ह आणि एनडीपी पक्षांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत याला विरोध केला आहे.