
बांगलादेशची राजधानी ढाका येथे अहमदाबादसारखीच भयंकर घटना घडली आहे. बांगलादेशच्या हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान एका शाळेवर कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 171 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 16 मुलांचा समावेश आहे.
ढाक्यातील नॉर्दर्न उत्तरा परिसरात सोमवारी दुपारी हा अपघात झाला. माइलस्टोन स्कूल व कॉलेजच्या परिसरात हे विमान कोसळले. अनेक शाळकरी मुले, कॉलेज तरुण आणि मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेले पालकही या वेळी तेथे होते. कोसळल्यानंतर काही क्षणांतच विमानाने पेट घेतला आणि धुराचे लोट हवेत उसळले. या भयानक घटनेमुळे शाळेच्या पॅम्पसमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. अपघातग्रस्त एफ-7 हे विमान चिनी बनावटीचे होते. चीनच्या जे-7 लढाऊ विमानाचे हे सुधारित मॉडेल होते.