शेख हसीना फरार घोषित

‘जेन झी’ उठावानंतर देशातून पलायन केलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह 260 जणांना फरार घोषित करण्यात आले आहे. बांगलादेशच्या सीआयडीने ही कारवाई केली. शेख हसीना व अन्य आरोपींच्या विरोधात बांगलादेशात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. या सर्वांना 11 नोव्हेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.