
बांगलादेश सरकार चीनकडून 20 जे-10सीई ही लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. बांगलादेश-चीन यांच्यातील हा करार तब्बल 2.2 अब्ज अमेरिकन डॉलर (18 हजार 500 कोटी) चा आहे. बांगलादेशकडे सध्या पैसे नाहीत, त्यामुळे ही रक्कम बांगलादेश पुढील 10 वर्षांत 2036 पर्यंत ईएमआयवर म्हणजेच हप्त्याने देणार आहे. या करारामध्ये प्रशिक्षण, देखभाल आणि इतर तांत्रिक सेवांचाही समावेश आहे. या करारावर सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश सरकारने ऑक्टोबर 2025 मध्ये चीनच्या जे-10सीई मल्टीरोल लढाऊ विमानांच्या खरेदीला मान्यता दिली आहे. ही 20 विमाने 2027 पर्यंत बांगलादेशमध्ये पोहोचवली जातील. ज्याची एकूण किंमत 2.2 अब्ज अमेरिकन डॉलर असेल, ज्यामध्ये प्रशिक्षण आणि सुट्टे भागांचा समावेश असेल. पुढील 10 वर्षांत ईएमआयद्वारे हे पैसे फेडले जातील. या करारामुळे चीन आणि पाकिस्ताननंतर या आधुनिक पिढीतील लढाऊ विमाने असलेला बांगलादेश तिसरा देश होईल. सरकारने मल्टीरोल जेट्स, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रs आणि लांब पल्ल्याच्या रडार खरेदीला मान्यता दिली आहे, असे एअर चीफ मार्शल हसन महमुद म्हणाले. परंतु त्यांनी या वेळी थेट चीनचे नाव घेतले नाही.
बांगलादेश आपल्या हवाई क्षमतांचा वेगाने विस्तार करत आहे आणि फोर्स गोल 2030 अंतर्गत आधुनिक हवाई दल तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे बांगलादेश मल्टी रोल जेट्स, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रs आणि लांब पल्ल्याच्या रडार खरेदी करत आहे.
44 विमानांत 36 चिनी विमाने
सध्या बांगलादेश हवाई दलाकडे 212 विमाने आहेत, त्यापैकी 44 लढाऊ विमाने आहेत. यामध्ये 36 चिनी एफ-7 विमाने, 8 रशियन मिग-29बी आणि काही याक-130 हलकी लढाऊ विमाने समाविष्ट आहेत. मे महिन्यात झालेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्ध वापरलेल्या लढाऊ विमानांपैकी जे-10सी ही लढाऊ विमाने होती. ही विमाने हिंदुस्थानच्या स्वदेशी शस्त्रांनी म्हणजेच ब्रह्मोस आणि आकाश तीर यांनी निक्रिय केलीय. त्याची जगभर चर्चाही झाली होती.