संभाजीनगरात बँक कर्मचाऱ्यांचं जोरदार धरणे आंदोलन

409
bank strike

बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून ‘युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियन’ अंतर्गत आदलत रोड वरील बँक ऑफ महाराष्ट्र समोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या युनियनच्या वतीने दोन दिवस संप पुकारल्यामुळे कोट्यवधी रुपयाच्या व्यवहार ठप्प झाला आहे. उद्या या संघटनाच्या वतीने क्रांतीचौकामध्ये निदर्शने केली जाणार आहेत.

पगारपत्रकाच्या घटकावर 20 टक्के वेतनवाढ द्यावी, 5 दिवसांचा आठवडा करावा, विशेष भत्यांचा मुळ वेतनामध्ये समावेश करावा, एनपीएस योजना निकाली काढवी, कुटुंब पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात यावी, कर्मचारी कल्याण निधी हा बँकेच्या ऑपरेटींग नफ्यानुसार निर्धारित करावा, निवृत्त लाभावर मर्यादेशिवाय प्राप्ती करातून सुट द्यावी, व्यावसायचे तास, दुपारचे जेवणाची वेळ एकसारखी निश्चित करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन देण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन अंतर्गत विविध नऊ संघटना एकत्र येऊन शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. यावेळी आंदोलनात ए.आय.बी.ई.ए, ए.आय.बी.ओ.सी, ए.आय.बी.ओ.ए, बी.ई.एफ.आय, आय.एन.बी.ओ.सी, एन.ओ.बी.डब्ल्यू आणि एन.ओ.बी.ओ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. जगदिश भावठाणकर, सुनिल लोढे, प्रताप खंडाळे, मदन कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी, महेश गोसावी, मारोती निकम, रविंद्र सुतवणे, रंजना गिते, संजय औरंगाबादकर, राजेंद्र मुगळकर, राजेंद्र देवळे, विजय गायकवाड, अजय फणसाळकर, विशाल गुप्ता यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते अंदोलानात मार्गदर्शन केले.

आपली प्रतिक्रिया द्या