Baramati Plane Crash – मुंबईतून टेकऑफ, बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात; अजित पवारांसह विमानात कोण होते? माहिती आली समोर

अपघातानंतर विमानाला लागली आग

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी अजित पवार बारामती येथे आले होते. मुंबईहून बुधवारी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी विमानाने बारामतीच्या दिशेने उड्डाण केले. त्यानंतर सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी लँडिंग दरम्यान विमानाला अपघात झाला.

अपघातग्रस्त विमान व्हीएसआर (VSR) या खासगी कंपनीच्या मालकीचे होते. विमानात अजित पवारांसह एकूण सहा जण होते. मृतांमध्ये अजित पवार, मुंबई पीसओ, दोन पायलट आणि फ्लाईट अटेंडन्ट यांचा समावेश होता.

अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे

1. माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब
2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव
3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
4. कॅप्टन संभवी पाठक
5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट