बरेलीमध्ये एका चिमुकल्याचा खतना करताना चुकीची नस कापली गेल्याने जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. ही घटना बरेलीच्या फतेहगंजची असून बोलले जाते की दीड महिन्याच्या चिमुकल्याचा खतना झाला आणि रात्री 8 च्या सुमारास त्याच्या मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अवघ्या आठ तासानंतर त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आणि कुटुंबावर शोककळा पसरली. बोलले जाते की, कुटुंबातील लोकं दिड महिन्याच्या मुलाचे खतरा करुन घेत होते. दरम्यान धारदार अवजाराने खतना करत असताना चुकीची नस कापली गेली. त्यामुळे त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलीस त्यांचा तपास करत आहेत.
फतेहगंज येथील रफिकच्या कुटुंबामध्ये दिड महिन्याच्या मुलाचे खतना करण्यासाठी कबीर न्हाव्याला गावावरुन बोलावले होते. मात्र त्याच्या बेजबाबदारपणामुळे चुकीची नस कापली गेली आणि रक्त थांबेनासे झाले. कुटुंबीय तो बरा होण्यासाठी प्रार्थना करत होते मात्र रात्री त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
या संपूर्ण प्रकरणावर एसपी दक्षिण मानुस पारीक यांनी सांगितले की, प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने मुलाची नस कापल्याप्रकरणी आरोपी न्हावी कबीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विच्छेदन झाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आल्यावर कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. नंतर त्यांनी होकार दिला. आरोपी नाईला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.