बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये हे नियम पाळणे सर्व संघांना बंधनकारक असणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास खेळाडूंवर कारवाई करण्यात येणार आहे.
क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने नवीन नियम जाहीर केले आहेत. जसे की एखाद्या खेळाडूला दुखापतीमुळे सामन्यातून मैदान सोडावे लागले, तर संबंधित खेळाडूला पुन्हा त्या सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही. त्याला थेट बाद ठरवण्यात येईल. त्याचबरोबर एखाद्या खेळाडूने चेंडूला थुंकी लावली तर त्या खेळाडूवर कारवाई करण्यात येईल आणि चेंडूही बदलण्यात येईल. या नियमांव्यतिरिक्त जेव्हा एखादा फलंदाज धाव घेऊन थांबतो तेव्हा कधी कधी ओव्हरथ्रोमुळे चौकार मिळतो. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा धाव घेण्यापूर्वी तो फक्त चौकार मानला जाईल. म्हणजे फक्त चार धावा संघाला मिळतील.