
जुलै महिन्यापासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब असणारा विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत मैदान गाजवण्यासाठी आता सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली असून त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यामध्ये उभय संघांमध्ये चार दिवसांच्या दोन कसोटी, तीन वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी BCCI ने हिंदुस्थान ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही सामन्यांसाठी ऋषभ पंतची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर साई सुदर्शनला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हिंदुस्थान ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांमध्ये पहिला चार दिवसीय कसोटी सामना 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत खेळला जाणार आहे. तर दुसरा चार दिवसीय कसोटी सामना 6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. ऋषभ पंत जवळपास तीन महिन्यांनी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्यावर असणार आहेत. तसेच चाहत्यांना त्याच्याकडून आक्रम फटकेबाजीची अपेक्षा असणार आहे.
पहिल्या चार दिवसीय कसोटी सामन्यासाठी इंडिया ‘अ’ संघ
ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), एन जगदीशन (यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुश कोटियन, मानव सुतार, खलील अहमद, गुर्नूर ब्रार, अंशुल कम्बोज, यश ठाकुर, आयुष बदोनी, सारांश जैन
दुसऱ्या चार दिवसीय कसोटी सामन्यांसाठी इंडिया ‘अ’ संघ
ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), केएल राहुल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुश कोटियन, मानव सुतार, खलील अहमद, गुर्नूर ब्रार, अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप