
महाराष्ट्र व हरयाणा येथे होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीमुळे बीसीसीआयने आपली निवडणूक एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी 22 ऑक्टोबरला होणारी ही निवडणूक आता 23 ऑक्टोबरला होणार आहे. बीसीसीआयचे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली.
बीसीसीआयची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे संलग्न संघटनांना निवडणूक घेण्यासाठी आणखी मुदत वाढवण्यात आली आहे. आता ही निवडणूक 28 सप्टेंबरऐवजी 4 ऑक्टोबरपर्यंत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच राजेंद्र लोढा समितीकडून करण्यात आलेल्या शिफारसीनुसारच संघटनांनी निवडणूक घ्यावी असेही पुन्हा एकदा यावेळी सांगण्यात आले आहे. अटींची पूर्तता न करणाऱया संघटनांना मतदान करता येणार नाहीए. तसेच त्यांचे कामकाज चालवण्यासाठी प्रशासकाची निवड करण्यात येईल अशा प्रकारचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून समोर आले आहे.



























































