बाद फेरीचा थरार आजपासून , सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी

सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचा उत्तरार्ध सुरू झाला असून, उद्यापासून या स्पर्धेच्या बाद फेरीचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत 38 संघ सहभागी झाले होते. त्यातील आठ संघ बाद फेरीत काwशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर मंगळवारपासून बाद फेरीला सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील 93 टक्के सामने संपलेले आहेत. कर्नाटक, पंजाब, तामीळनाडू, हिमाचल प्रदेश, हरयाणा, बडोदा, बिहार व राजस्थान या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेला आहे. उपांत्य लढती 29, तर अंतिम लढत 31 जानेवारीला होणार आहे. स्पर्धेत गुजरातचा अवि बरोत व बिहारचा आशुतोष अमन यांनी आपापल्या संघासाठी लक्षवेधी कामगिरी केली आहे. बरोत हा स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा दुसऱया क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्याने 283 धावा फटकावल्या. आशुतोषने स्पर्धेत सर्वाधिक 14 बळी टिपले. या स्पर्धेत अवि बरोतसह विराट सिंह , शेल्डन जॅक्सन , मोहम्मद अझरुद्दीन , केदार देवधर, पुनीत बिष्ट, आशुतोष अमन, संजय यादव व मयांक डागर या खेळाडूंनी आपापल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी केली. यंदाच्या आयपीएल लिलावात या सर्व खेळाडूंना घेण्यासाठी फ्रेंचाईजींमध्ये चुरस बघायला मिळणार आहे.

बाद फेरीचे वेळापत्रक

26 जानेवारी – पंजाब वि. कर्नाटक
26 जानेवारी – तामीळनाडू वि. हिमाचल प्रदेश
27 जानेवारी – हरयाणा वि. बडोदा
27 जानेवारी – राजस्थान वि. बिहार

आपली प्रतिक्रिया द्या