सर्वोत्कृष्ट सासू बनण्यासाठी काही कानमंत्र !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विवाह हा फक्त दोन व्यक्तींना एकत्र आणत नाही तर दोन कुटुंबाना एकत्र आणतो. त्यातही सासू आणि सुनेचे नाते तर कधी कधी अगदी नवरा बायकोच्या नात्याहुनही जवळचे ठरते. कधी काही गैरसमजामुळे हे नाते ताणले जाते.. अर्थात तुटत नाही.. पण या नात्यात गोडवा आणण्यासाठी प्रयत्न दोन्हीकडून व्हावे लागतात. पाहूया सर्वोत्कृष्ट सासू होण्यासाठी काय करावे लागते..
1) मुलगा आणि सून यात भेदभाव नको – जर आपण आपल्या मुला किंवा मुली साठी काही भेटवस्तू आणाल तर सुने साठी आणि जावयासाठी देखील काही भेटवस्तू आणा. असं केल्याने त्यांना चांगले वाटेल.

2) दोघांच्या भांडणात पडू नका – प्रत्येक जोडप्यात वाद आणि भांडण होतातच. गरज नसल्यास मुलगा- सून, मुलगी-जावई यांचा भांडण्यात डोकावू नका. आणि जर गरज असल्यास कोणा एकाचा पक्ष घेऊ नका. अशा परिस्थितीत आपली भूमिका तटस्थ ठेवा.

3) ढवळाढवळ करू नका- सासू म्हणून आपल्या सुनेची काळजी घेणं चांगली गोष्ट आहे. सून नोकरदार असल्यास तिचा ऑफिसच्या कामा बद्दल विचारपूस करणे चांगले आहे. पण तिच्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणे चांगले नाही. असं केल्याने आपण तिच्यावर विनाकारण लक्ष ठेवल्यासारखे होते.
4) गॉसिपिंग टाळा – बऱ्याच वेळा काही बायका आपली सुन किंवा जावयाबद्दल आपल्या मित्र, नातेवाईकांमध्ये निंदा करतात. असं केल्याने आपलं नातं कमकुवत होऊ शकतं.आपण त्यांची निंदा नालस्ती करता हे त्यांना कळल्यावर त्यांना वाईट वाटू शकते आणि नात्यात दुरावा येऊ शकतो.

5) त्यांच्या खास गोष्टी लक्षात ठेवा- आपल्या सून आणि जावयाशी निगडित काही खास तारखा आणि दिवस लक्षात ठेवा. त्यांना त्या खास दिवशी शुभेच्छा आणि भेटवस्तू द्या.असं केल्याने आपण आपल्या नात्याला सुंदर आणि घट्ट करू शकता.