मुलासोबत भांडण केल्याच्या रागातून कोयत्याने हल्ला, 13 जणांविरूद्ध गुन्हा दाखल

600

मुलासोबत वाद करून धमकी दिल्याचा राग मनात ठेऊन कोयत्याने हल्ला करत मारहाण केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी गावात घडली. या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले आहेत.

कृष्णा निकम हे कामथे येथे चालक म्हणून नोकरीला आहेत. कामथे येथून कुटगिरीला जात असताना कुभांरखणी बुद्रुक येथे रवींद्र काजवे याच्यामुलासोबत कृष्णा निकम यांचे भांडण झाले. त्या मुलाला मारहाण करून निकम यांनी धमकी दिली. त्याचा राग मनात धरून रवींद्र काजवे यांनी रोहित काजवे, सूरज कदम, शुभम कदम आणि इतर नऊ जणांचा जमाव करत कृष्णा निकम यांना मारहाण केली.

रवींद्र काजवे यांनी निकम यांच्यावर कोयत्याने वार केला. पतीला सोडविण्यासाठी गेलेल्या आरती कृष्णा निकम यांच्या हातावर रवींद्र काजवे यांनी वार केला. रोहित काजवे, सूरज कदम, शुभम कदम आणि अन्य जणांनी घरातील चंद्रभागा निकम आणि दगडू निकम यांना मारहाण केली. होम क्वारंटाईन असलेले महेंद्र निकम सोडविण्याकरिता गेले असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. संगमेश्वर पोलिसांनी एकूण 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी नऊ जण अनोळखी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या