बीडमध्ये कोरोनाचा उच्चांक, 83 पॉझिटिव्ह

443

बीड जिल्ह्यात कोरोना कसा पाय पसरत आहे हे आता आकडेवारीवरून दिसत आहे. काल 83 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात बीड शहरातील 20, परळी शहरातील 36, अंबाजोगाईत 8, गेवराईत 7, पाटोद्यात 4, माजलगावात 2, केजमध्ये 2, धारूर 2, वडवणी आणि शिरूर तालुक्यात 1-1 रूग्ण सापडला आहे. रविवारच्या या वाढीमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 864 वर पोहचला आहे. त्यात मयताची संख्या 30 वर पोहचली आहे.

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाने चांगला विळखा घातला आहे. काल कोरोनाच्या आकड्याने उच्चांक गाठला, तब्बल 83 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा आकडा 864 वर गेला आहे. आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. काल बीड शहरात 20 आणि परळीत 36 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. आतापर्यंत 419 जणांवर उपचार सुरू होते आणि 416 जण कोरानामुक्त झाले आहेत. आज रविवारी तब्बल 42 जण कोरोनावर विजय प्राप्त करून घरी परतत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या