बीड जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, आज 129 पॉझिटिव्ह रूग्णांची भर

बीड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या घटल्याचे चित्र होते. मात्र गुरुवारपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज 686 जणांच्या तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात 129 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 557 जण निगेटिव्ह आले आहेत.

बीड जिल्ह्यात दैनंदिन तपासणीमध्ये गेल्या आठवड्यात रूग्णांची संख्या घटू लागली होती. तीन दिवसांचा अहवाल शंभरच्या आत होता मात्र कालपासून पुन्हा रूग्ण संख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी दुपारी आलेल्या 686 जणांच्या अहवालात 129 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहेत तर 557 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज अंबाजोगाईमध्ये 15, आष्टी 25, बीड 30, धारूर 18, गेवराई 5, केज 2, माजलगाव 8, परळी 7, पाटोदा 5, शिरूर 9, आणि वडवणी 5 अशी रूग्णसंख्या आहे. बीड जिल्ह्यात आता एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजार 824 वर गेला आहे. 10 हजार 818 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 1432 जण सध्या उपचार घेत आहेत. गुरूवारी 135 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बीड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 374 जणांचा बळी घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या