बीडमध्ये गौरी-गणपतीसमोर उभारला अनोखा देखावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड शहरातील चौरे कुटूंब दरवर्षी चर्चेत असते ते आगळ्या वेगळ्या गणेशोत्सवातील देखाव्याने. गौरी गणपती समोर समाज प्रबोधन करणारा हलता देखावा ते दरवर्षी उभारतात. यंदा चौरे कुटूंबाच्या घरच्या गौरी गणपती समोर दुष्काळी गाव आणि जलयुक्त शिवारचा हलता देखावा लक्ष वेधून घेत आहे.

बीड शहरातील सुभाष रोडनजीक वास्तव्यास असणारे चौरे कुटूंब दरवर्षी आपल्या निवासस्थानी गौरी गणपतीत सामाजिक संदेश देणारा आणि समाज प्रबोधन करणारा हलता देखावा उभारतात. यंदाही चौरे कुटूंबानी वेगळ्या विषयावर हलता देखावा उभारला आहे. दुष्काळ गाव आणि गावातील जागरूक नागरिकांनी केलेले जलयुक्त गाव असा संदेश देखाव्यातून देण्याचा त्यांचा प्रयत्न केला आहे. आपणच आपला दुष्काळ हटवू शकतो, पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे, तो कसा वाचवला पाहिजे, काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागाची जीवनशैली कशी होती, पाण्याचे स्रोत कसे टिकवले जायचे या बाबी या देखाव्यात दाखवण्यात आल्या आहेत. ग्रामीण विषय असणारा हा देखावा दिशादर्शक ठरत आहे. या देखाव्यासाठी मीना विलासराव चौरे, आशा अमोल चौरे यांची कल्पकता वापरली आली.