
बीड जिल्ह्यात दुपारी 794 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात 742 जण केरोना निगेटिव्ह आले तर 52 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात बीड आणि अंबाजोगाई तालुक्यात रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसापासून वाढतच आहे.
बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी दुपारी 794 जणांच्या तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 742 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 52 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात अंबाजोगाई 16, आष्टी 2, बीड 17, गेवराई 3, केज 4, माजलगाव 8, परळी 1, पाटोदा 2, शिरूर 2 अशी संख्या आहे.
आजपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये 2 लाख 14 हजार 237 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात 1 लाख 95 हजार 402 जण निगेटिव्ह आले तर 18 हजार 835 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 578 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात पॉझिटिव्ह दर 13.1 एवढा आहे. मृत्युचा दर 3.6 तर रूग्ण दुप्पट होण्याचा दर 332 दिवसाचा आहे. रिकव्हरी रेट 95.11 एवढा आहे. आतापर्यंत 17 हजार 914 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.
व्यापाऱ्यांनी अॅन्टिजेन टेस्ट न केल्यास थेट कारवाई
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता छोटे व्यापारी, मोठे व्यापारी, दुकानदार, भाजीपाला विक्रेते यांनी अॅन्टिजेन टेस्ट करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आगामी चार दिवसानंतर या अभियानाला सुरूवात केली जाणार आहे.
अॅन्टिजेन टेस्ट न केल्यास व्यापाऱ्यांना आपली दुकाने उघडता येणार नाहीत आणि कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. मात्र शासनाने व्यापाऱ्यांना कोव्हिड लस द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे व्यापाऱ्यांच्या वतीने संतोष सोहनी यांनी केली आहे.

























































