
सामना प्रतिनिधी । बीड
सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सरकारच्या कारकिर्दीतील शेवटच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी किती तरतूद केली जाते याकडे लक्ष लागले आहे.
बीड जिल्हानियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाली. या बैठकीला खा.प्रितम मुंडे, जि.प.अध्यक्ष सविताताई गोल्हार, आ.आर.टी. देशमुख, आ. सुरेश धस,आ. संगीताताई ठोंबरे, आ. भिमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार,आ. जयदत्त क्षीरसागर, जिल्हाधिकारी एम.डी. सिह, जी.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.के. आगवाने, धनराज नीला यांच्या सह अधिकारी सदस्य यांची उपस्थिती होती.






























































