
लॉकडाऊन असल्याने प्रत्येक जिल्ह्यात इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत. बीड येथे मध्यप्रदेश मधील काही मजूर टॉवरच्या कामाला आलेले होते. या मजूरांना मध्य प्रदेशकडे घेवून जात असताना डाक पार्सलच्या टेम्पोला खामगावच्या चेकपोस्टवर पकडण्यात आले. यात बारा मजूर होते. चालकाविरोधात पोलिसांनी कारवाई केली. या मजूरांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले.
लॉकडाऊन असल्याने मध्य प्रदेशातून कामासाठी आलेले हे मजूर बीडमध्ये अडकून पडले होते. बीड ते दिल्ली पोस्टाचे पार्सल टेम्पोद्वारे नेले जाते. मंगळवारी सकाळी बीड येथून दिल्लीकडे पार्सल घेवून जात असलेला टेम्पो क्र.एच.आर.38 एस.2046 च्या चालकाने बारा मजुरांना टेम्पोच्या मागच्या भागात बसवले होते. खामगावच्या चेकपोस्टवर टेम्पोची चेकींग झाली असता आतमध्ये मजूर आढळून आले. याप्रकरणी चालक करमवीर दुनीचंद रा.दिल्ली याच्याविरोधात कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप काळे, खटाणे, संतोष क्षीरसागर यांनी केली. या मजूरांना क्वारंटाईमध्ये ठेवण्यात आले.
तीन दिवसांपासून मजूर उपाशी
ताब्यात घेण्यात आलेल्या मजुरांना रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. जे मजूर दिल्लीकडे जात होते. ते सर्व तीन दिवसापासून उपाशी होते. यामुळे या या मजुरांच्या जेवणाची सोय पांडुरंग यात्रा कंपनीचे संजय पाडूळे यांनी केली.



























































