इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ त्यांनी स्वतःला बाभळीच्या काट्यावर दिले झोकून

609

आपल्या पायात काटा रूतला की डोळ्यात टचकण पाणी येते. मात्र, एखादी व्यक्ती चक्क बाभळीच्या काट्यांवर झोपतो, ही कल्पनाच करवत नाही. पण अशीच एक बातमी समोर आली आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत राज्यभरात कुठे विरोध तर कुठे त्यांना पाठिंबा दिला जात आहे. इंदुरीकर यांनी जे बोललं ते सत्य आहे. त्यांच्यावर टीका करण्याचा कोणालाही अधिकार नाही. असे सांगत बीडच्या तांदळवाडी येथील महादेव मंदिरातील भगवान महाराज यांनी बाभळीच्या काट्यांवर निद्रासाधना सुरू केली आहे.

बीडपासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदळवाडी गावात महादेव मंदिर आहे. याच मंदिरात बारा वर्षांच्या तपासासाठी भगवान महाराज आले आहेत. गतवर्षी भगवान महाराजांनी पाऊस पडू दे म्हणून झाडावर स्वतःला टांगून घेऊन साधना केली होती. आता मात्र भगवान महाराजांनी चक्क इंदुरीकर यांना त्रास झाला म्हणून स्वतःला त्रास करत बाभळीच्या टोकदार काट्यावर निद्रस्त होऊन साधना सुरू केली. दरम्यान इंदुरीकर महाराजाच्या समर्थनार्थ गावागावातून समर्थक समोर येत आहेत

आपली प्रतिक्रिया द्या