नाकले पिंपळगावात भावाकडून सख्ख्या भावाचा खून

596
प्रातिनिधीक फोटो

बीड जिल्ह्यातील माजलगांव तालुक्यातल्या दिंद्रुडपासून जवळच नाकले पिंपळगाव येथे लक्ष्मण दशरथ काळे (वय 27 वर्षे) या तरूणाचा 30 मेच्या रात्री खून करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी मयताच्या भाऊ व आई यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील दिंद्रुड पासून जवळच असलेल्या नाकले पिंपळगाव येथे गजानन व लक्ष्मण दशरथ काळे हे दोघे भाऊ व आई हे तिघे राहतात. तिघेही साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी मजुरी काम करतात. गजानन व लक्ष्मण हे दोघे भाऊ दररोज दारू पिऊन भांडण करत असत. शनिवारी रात्रीही त्यांचं भांडणं झालं होतं. त्या भांडणाच्या भरात लक्ष्मणच्या डोक्यात व छातीवर त्याच्या भावाने कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यास शेजारच्या उकिरड्यावर टाकून दिले.

रविवारी सकाळी गावातील लोकांना हा खून दिसून आल्याने खळबळ उडाली. दिंदृड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गव्हाणकर, उपनिरीक्षक विजय नचान व पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेतला. तसेच भाऊ व आई यांनाही ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या