
पोलीस म्हणजे करडी नजर, दरारा, धाक असेच चित्र आपल्यासमोर उभे राहते. पण पोलिसांमध्येही एक सहृदय माणूस दडलेला असतो याची प्रचीती नुकतीच बीडकरांना आली. सात वर्षांपूर्वी निघून गेलेल्या मुलाला पोलिसांनी शोधून काढले. आई मुलाची भेट पाहून पोलीसही हेलावून गेले.
पिंपळनेर येथील काकासाहेब माळी आणि त्यांची पत्नी हे ऊसतोड कामगार, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यामुळे आपल्या राजू नावाच्या मुलाला त्यांनी नाळवंडी येथील संगमेश्वर विद्यालयात टाकले. राहण्याची सोय नसल्यामुळे तो शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्याकडे राहत होता. 2017 मध्ये ऊसतोडीच्या हंगामात काकासाहेबांचा कोयता कर्नाटकात गेला. डिसेंबर महिन्यात राजू शाळेत गेला, तो परत आलाच नाही. मुलगा निघून गेल्याचे कळाल्यानंतर काकासाहेब परतले. मुलगा परत येईल या भाबड्या आशेपोटी ते पोलिसांकडेही गेले नाहीत मलाची वाट पाहण्यात पाच वर्ष गेली आई-मुलाची यांनी राजूच्या फाईलवरची धूळ झटकली. सर्वात भेट पाहून पोलीसही हेलावले.
2023 मध्ये राजूच्या आईने पिंपळनेर पोलीस ठाणे गाठले आणि मुलाला शोधून काढण्यासाठी आर्जव केले. 2025 मध्ये प्रकरण मानवी तस्करीशी निगडित विभागाकडे वर्ग करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी जाधव अगोदर त्यांनी राजूच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यांचे अश्रू थांबतच नव्हते. त्यानंतर राजूच्या शाळेत जाऊन माहिती घेतली.
पोलिसांमध्येही एक सहृदय माणूस दडलेला असतो याची प्रचीती नुकतीच बीडकरांना आली. 7 वर्षांपूर्वी निघून गेलेल्या मुलाला पोलिसांनी शोधून काढले. आई मुलाची भेट पाहून पोलीसही हेलावून गेले. pic.twitter.com/rZvLQ9WTrb
— Saamana Online (@SaamanaOnline) August 9, 2025
राजू ज्यांच्याकडे राहत होता ते शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांचीही भेट घेतली. परंतु राजूचा ठावठिकाणा लागला नाही. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी तपासात स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेण्याची सूचना केली. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम खटावकर यांनीही राजूच्या शोधाला हातभार लावला. अखेर टेक्निकल टीमच्या प्रयत्नांना यश आले. राजूचे लोकेशन पुण्यात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला शोधन विश्वासात घेऊन बीडला आणले.
‘तातडीने कार्यालयात या…’
पोलिसांनी राजूचा ठावठिकाणा लागल्याचे माळी दाम्पत्याला सांगितले नव्हते. तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचा, असा निरोप त्यांना देण्यात आला. आज सकाळी काकासाहेब माळी आणि त्यांच्या पत्नी अधीक्षक कार्यालयात आले. कांवत यांच्या कक्षात मुलाला समोर उभे पाहून त्यांचा स्वतःवरच विश्वास बसेना. मुलाला पाहताच आईने त्याच्याकडे धाव घेतली.