रामनवमी ते रमजान ईद, बीडमध्ये शिवसेनेचा भाईचारा

1075

शिवसेना प्रमुखांचे विचार तेवत ठेवण्यासाठी सामान्य शिवसैनिक ही काय समाजकार्य करू शकतो हे बीड मधील एका निष्ठावंत शिवसैनिकाने दाखवून दिले. कोरोनाच्या संकटात लॉक डाऊन मुळे हजारो कुटूंब रस्त्यावर आले. हाताला काम नाही खिशात पैसा नाही कच्चे बच्चे कसे जगवायचे याची भ्रांत असलेल्या गरीब कुटूंबाची चिंता दूर केली शुभम दिलीप धुत या शिवसैनिकाने राम नवमी ते रमजान ईद या कालावधीत बीड शहरासह 150 गावातील 5 हजार कुटूंबियांना घरी जाऊन थेट मदत केली.

दिलासादायक! राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचा विक्रमी उच्चांक, एकाच दिवशी 8381 रुग्णांना डिस्चार्ज

कोरोनाचा विळखा वाढत असताना लॉक डाऊनला सुरुवात झाली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संकटाचा यशस्वी मुकाबला करत आहेत. जनतेच्या भावनेला साद घालून जगण्याची उमेद निर्माण करत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या धीरोदत्त वाटचालीने प्रभावित होऊन बीड शहरातील शुभम दिलीप धुत हा शिवसैनिक मदत यज्ञासाठी रस्त्यावर उतरला. भयानक परिस्थिती समोर येऊ लागली. गोरगरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्यांसह निराधार लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यथा समोर दिसु लागली. अनेक सामाजिक संस्था मदत करत असल्याचे पाहून नगरसेवक शुभम धुत याने राजयोग फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी मदत कार्य सुरू केले. राजयोग फाउंडेशनचे संस्थापक तथा पर्यटन विकास महामंडळाचे माजी सदस्य दिलीप धुत यांनी मुलाच्या या समाजकार्याला बळ दिले.

screenshot_2020-05-29-22-20-27-654_com-google-android-gm

केवळ बीड शहरापुरतेच मर्यादित न राहता तब्बल 150 गावामधील कुटूंबाना मदतीचा हात दिला. रामनवमीला  मदत कार्याचा यज्ञ सुरू झाला. शहरातील विविध भागासह वस्त्या वाडी आश्रमात राहणारी गरीब कुटूंब, पालावर वास्तव्यास असणारी ती अनेक कुटूंब या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क, सॅनिटायझयर  देऊन सुरुवात केली. पुढे ग्रामीण भागातील गावागावात जाऊन तब्बल 5 हजार  कुटुंबांना अन्न-धान्य व किराणा साहित्य वाटप केले. या मदतीचा शेवट मुस्लिम बांधवांच्या गरजु निराधार 300 श्रमिक कुटुंबांना ईद साजरी करण्यासाठी शिरखुर्म्याचे साहित्य देऊन झाला.

screenshot_2020-05-29-22-20-18-743_com-google-android-gm

इन्फट आश्रम, आदीवासी समीकरण, सेवाश्रम, सर्पराज्ञी प्रकल्प, कामधेनु आरोग्यधाम, हत्तीखाना, कृष्ण मंदिर येथील महानुभाव पंथ आश्रम, शांतीवन सह अन्य काही कम्युनिटी किचन्स, एकल महीला संघटना – निराधार विधवा महिला, बीड शहरातील सर्व स्मशानभूमी, कब्रस्तान, वाणी समाजातील स्मशानभूमी, चर्च व ग्रेवयार्ड याठिकाणांची देखभाल व करणारे कुटुंबांसह, शहरातील वासुदेव समाजातील कुटूंब, नाभिक समाजातील कामगार, भटक्या विमुक्त मदारी समाजातील गरजु, घरकाम करणार्‍या महीला, परिट समाजातील गरजु, लोहार समाजातील उपेक्षित,  श्रमीक कामगार, मुस्लिम निराधार विधवा महिला, सायकल रिक्षा चालक, ऑटो रिक्षा चालक, सर्पमित्र, निराधार अपंग, सुतार समाजातील गरजु, ढोल-ताशा, हलगी वादक, यासह शहरातील असंख्य गरजु कुटुंबांना शुभम धुत मदत करत होता. अन्नधान्य, किराणा सामान सह जीवन जगण्यासाठी  जे लागेल ते घर पोहोच उपलब्ध करून दिले जात होते. बीड शहरातील हे दिलीप धुत यांचे कुटूंब म्हणजे मदतीला धावून येणारे प्रत्येकाचे हक्काचे माणसे होय मग दिवाळी असो, पाडवा, मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या या परिवाराने कोरोनाच्या संकटात हजारो कुटूंब जगवली.

आपली प्रतिक्रिया द्या