पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, रस्त्यांची कामे पूर्ण होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नालेसफाई आणि रस्त्यांवरील चर पुनर्भरणी या दोन महत्त्वाच्या कामांसाठी 30 निविदांना महापालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल यांनी आज मंजुरी दिली. या सर्व निविदांच्या कामांची एकूण किंमत सुमारे 545 कोटी इतकी आहे.

पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाईच्या पार्श्वभूमीवर, मोठ्या नाल्यांसाठी सुमारे 71 कोटींच्या 6 निविदा, लहान नाल्यांसाठी सुमारे 91 कोटींच्या 17 निविदा तर मुंबई शहरासाठी 2, पूर्व उपनगरांसाठी 6, तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी 9 याप्रमाणे निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे 162 कोटींच्या प्रस्तावांना प्रशासकांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच्या रस्त्यांवरील चर पुनर्भरणी कामांचा भाग म्हणून परिमंडळनिहाय प्रत्येकी एक अशा 7 निविदांनादेखील मान्यता मिळाली असून त्यांची एकत्रित किंमत 383 कोटी रुपये इतकी आहे. त्यासाठी कंत्राटदाराची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.