हे करून पहा – सकाळी झोपून उठल्यावर प्या कोमट पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याची पद्धत जुनीच आहे. आयुर्वेदात कोमट पाणी पिणे हा अनेक व्याधींवरील उपाय मानला जातो. मात्र, कोमट पाणी जास्त प्रमाणात प्यायला नको.

सकाळी उपाशी कोमट पाणी प्यायल्याने जठराग्नी सक्रिय होतो. रात्री झोपेमध्ये आपले पचन तंत्र आराम करत असते. ते सक्रिय होते.

कोमट पाणी प्यायल्यामुळे आतडय़ातील विविध क्रिया कार्यान्वित होतात, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. कोमट पाण्यामुळे वजन कमी करण्यासदेखील मदत होते.