
दिवसभर दमून भागून आल्यानंतर, पायाच्या तळव्यांना मसाज करणं म्हणजे एक सुख आहे. पायाच्या तळव्यांना मसाज केल्यामुळे, आपल्या संपूर्ण शरीराला आराम मिळतो. त्यामुळेच आपली ताण तणावापासूनही मुक्तता होते. तळव्यांवर आपल्या पूर्ण शरीराचा जोर असल्यामुळे, तळव्यांची काळजी आणि निगा राखणे खूप गरजेचे आहे.

तळव्यांना मसाज करण्याचे फायदे
पायाच्या मसाज दरम्यान, तळवे देखील मालिश केले जातात, ज्यामुळे घोट्याच्या दुखण्यापासून आराम मिळतो.चाळीशीनंतर, स्त्रियांना अनेकदा घोट्याच्या आणि पायांच्या दुखण्याने त्रास होतो. तुम्ही देखील घोट्याच्या दुखण्याने त्रस्त असाल तर, तळव्यांना मसाज करा हा मसाज खूप फायदेशीर ठरू शकतो.

रोज तळव्यांना मसाज केल्यामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण वाढते. तसेच पायाच्या नसांनाही आराम मिळतो आणि घोट्याच्या वेदना कमी होतात.
महिलांसाठी मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या 5 दिवसात महिलांना पायदुखीचा खूप त्रास होतो. अशा स्थितीत पायांना मसाज करून मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. पायांना मसाज केल्याने मासिक पाळीच्या दरम्यान मूड स्विंगपासूनही आराम मिळतो. तसेच थकवाही कमी होतो.

निद्रानाशाने त्रस्त असाल तर, रोज रात्री पायाच्या तळव्यांना तेलाने मसाज करा. यामुळे तुमच्या शरीराचा थकवा आणि तणाव दोन्ही दूर होतील आणि तुम्हाला चांगली झोपही चांगली लागेल.
दिवसभराच्या थकव्यामुळे अनेकदा स्नायू दुखतात. अशा परिस्थितीत, यापासून आराम मिळवण्यासाठी, आपण दररोज पायांची मालिश करू शकता. स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळेल. तसेच तुम्हाला आराम वाटेल. पायाला मसाज केल्याने स्नायू सक्रिय होतात.

मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे तणावही दूर होतो. हलक्या सूर्यप्रकाशात मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळतो.
ऑलिव्ह ऑईलने तळव्यांना मसाज करणे हे खूप फायदेशीर आहे. या तेलाचा वापर केल्याने दुखण्यापासून आराम मिळतो. तसेच तणाव दूर होतो. ऑलिव्ह ऑइल हलके कोमट करून मसाज करावे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)