Sapota Benefits- वजन कमी करण्यासाठी चिकू आहे सर्वोत्तम, वाचा चिकू खाण्याचे खूप सारे फायदे

चिकू हे फळ तसं दुर्लक्षित आहे. परंतु याचे फायदेही तितकेच महत्त्वाचे आहेत. चिकू या फळाला फार मागणी नसली तरी, चिकूचा मिल्कशेक मात्र अनेकांना प्रिय आहे. चिकूचे फायदे अगणित असल्यामुळे, चिकू चवीने खाण्यापेक्षा तो फायद्यांसाठी तरी नक्कीच खायला हवा. कोणत्याही सीझनमध्ये त्वचा निरोगी ठेवण्यासाठी चिकूचे सेवन करू शकता. चिकूमध्ये असलेले टॅनिन दाहक-विरोधी म्हणून काम करतात. या परिणामामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या जसे की अन्ननलिका फुगणे, पोटात गॅस, पोटदुखी कमी होण्यास मदत होते.

 

चिकू खाण्याचे फायदे

चिकू त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ई, ए आणि सी त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. इतकेच नाही तर त्यात मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील आहेत जे त्वचा कोरडी होण्यापासून आपल्याला वाचवतात.

 

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चिकूचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चिकूच्या सेवनाने चयापचय नियंत्रित ठेवता येतो.

 

चिकूमध्ये आढळणारे पोषक तत्व दीर्घकाळ पोट भरल्यासारखे असतात. त्यामुळे भूक कमी लागते आणि वजनही सहज कमी करता येते.

 

चिकूमध्ये व्हिटॅमिन अ आणि ब जीवनसत्व असतात. लोह, कॅल्शियम, फायबर, अॅन्टी ऑक्सिडाइज सारखे घटक असतात. या फळाचं नियमित सेवन केल्यानं कर्करोगाच्या आजार होण्याचा धोका कमी होऊ शकतो. याशिवाय शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

 

चिकू हे फळ डोळ्यांसाठी देखील फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. या फऴामध्ये अ जीवनसत्व असल्यानं डोळ्यांसाठी हे फळ गुणकारी आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण याचं सेवन करू शकतात.

 

चिकू खायलाही चांगला आणि शरीरासाठी गुणकारी आहे. रोज एक चिकू खाल्ल्यानं आपलं सौंदर्य आणि त्वचा अधिक निरोगी होण्यास मदत होते.

 

 

(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)