Health Tips – सलग 21 दिवस अंकुरलेली कडधान्य खाण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा

निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये विविध पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. यामध्ये ऋतूमानानुसार उपलब्ध असणारी फळे, भाज्या त्याचबरोबर डाळींचाही आपल्या आहारात समावेश असायला हवा. बरेच लोक नाश्त्यामध्ये अंकुरलेली कडधान्ये खाण्याला पसंती देतात. अंकुरलेली कडधान्ये प्रथिनांचा उत्तम स्त्रोत मानला जातो. यामध्ये फायबरचे प्रमाणही मुबलक आढळते. तसेच पोटही भरलेले राहते. म्हणूनच अंकुरलेली कडधान्ये आपल्या शरीराला वरदानापेक्षा कमी नाही.

दररोज 10 ते 12 शेवग्याची पाने खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा

निरोगी राहण्यासाठी निरोगी अन्न खाणे खूप महत्वाचे आहे. अंकुर उगवल्यानंतर, बिया, बीन्स आणि धान्यांमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण वाढते. यामुळे पचवणे आणि पोषक तत्वे शोषणे सोपे होते.

अंकुरलेल्या कडधान्ये प्रथिने, फायबर आणि एंजाइम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. म्हणून पचनासाठी फायदेशीर असतात आणि आतड्यांच्या आरोग्याला चालना देतात. अंकुरांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते. त्याच वेळी, त्यात असलेले व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे खनिजे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Health Tips – फक्त मुखशुद्धीसाठी नव्हे तर बडीशेपचे इतरही आहेत आरोग्यवर्धक फायदे

दररोज अंकुरलेली कडधान्ये खाण्याचे फायदे

अंकुरलेल्या कडधान्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे मधुमेहाचे रुग्ण देखील ते सेवन करू शकतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते.

अंकुरांमध्ये असलेले क्लोरोफिल शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करू शकते. हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधारते आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह योग्य असतो. अंकुर नियमितपणे खाल्ल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होण्यास मदत होते. वृद्धत्व कमी करून त्वचा निरोगी ठेवण्यास देखील मदत होते.

रोजच्या जेवणात एक लहान वाटी अंकुरलेले कच्चे कच्चे, हलके शिजवलेले किंवा सॅलडसोबत खाऊ शकता. त्यात असलेले पोषक घटक शरीराला ऊर्जा देण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.