
घरी शिळा भात राहिल्यावर, काही घरांमध्ये या भातापासून फोडणीचा भात तयार केला जातो. परंतु काही वेळा मात्र अनेकजण हा भात फेकून देतात. परंतु या फेकून देण्यात येणाऱ्या भातामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. शिळा भात हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो.
शिळा भातामध्ये पचन आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले अनेक पोषक घटक असतात.
रात्री झोपण्यापूर्वी ही पाने खा, सकाळी पोट होईल पटकन साफ, वाचा
शिळ्या भाताचे प्रमुख फायदे
शिळ्या भातातील स्टार्च हा पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामुळे आपल्या शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. तसेच आपल्या पोटाशी संबधित समस्या कमी होतात.
शिळ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे रक्तातील साखर कमी होते. वजन कमी करण्यासाठी म्हणूनच हा भात खाणे हितावह मानले जाते.
शिळ्या भातामध्ये असलेले प्रतिरोधक स्टार्च हळूहळू पचते. यामुळे मधुमेह व्यवस्थापनात मदत करते. ते अचानक वाढण्यास प्रतिबंध करते आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.
पेरूपेक्षा पेरुची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणुन घ्या
शिळ्या भातात प्रीबायोटिक्स भरपूर असतात. यामुळे आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया वाढवते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यामुळे शरीरात संक्रमण आणि रोगांचा धोका देखील कमी होतो.
शिळा भात आपल्याला दीर्घकाळ ऊर्जा प्रदान करतो. सकाळी किंवा दुपारी तो खाल्ल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते आणि थकवाही कमी होतो.
कोणती खबरदारी घ्यावी?
शिळा भात झाकून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा; अन्यथा, त्यात धोकादायक जीवाणूंची पैदास होऊ शकते.
जास्त दिवस असलेला शिळा भात खाल्ल्याने अन्न विषबाधा होऊ शकते.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही शिळा भात फेकून देणार असाल तेव्हा थांबा आणि विचार करा. योग्य प्रमाणात सेवन केल्यास, शिळा भात तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतो.































































