
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी दरमहा 1500 रुपये भत्ता देण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली.
निवडणूक आयोगाने एसआरएच्या नावाखाली पश्चिम बंगालमधील मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळली आहेत. याच्या निषेधार्थ आयोजित धरणे आंदोलनात बोलताना ममता बनर्जी यांनी ‘युवा साथी’ योजनेची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर ममता सरकारने केलेल्या या घोषणेला मास्टरस्ट्रोक मानले जात आते.
कोणाला मिळणार योजनेचा लाभ?
- ज्या तरुणांनी माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ते या भत्त्यासाठी पात्र असतील.
- 21 ते 40 वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींना या योजनेचा लाभ मिळेल.
- या योजनेची अंमलबजावणी 7 मार्चपासूनच सुरू झाली आहे.
दरम्यान, ‘युवा साथी’ योजनेअंतर्गत जे विद्यार्थी अद्याप शिकत आहेत आणि शिष्यवृत्तीव्यतिरिक्त इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांना ही रक्कम मिळेणार आहे.
भाजपच्या इशाऱ्यावर राजकारण करू नका! ममता बॅनर्जी यांचा राष्ट्रपती मुर्मू यांना खोचक सल्ला
बंगालमधील बेरोजगारी 40 टक्क्यांनी घटला
तृणमूल काँग्रेस सरकारने रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत. यामुळे पश्चिम बंगालमधील बेरोजगारीचा दर 40 टक्क्यांनी कमी झाला आहे, असा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच आम्ही किमान 40 लाख लोकांना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. यापैकी 10 लाख लोकांना आधीच रोजगार मिळाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.





















































